भजनी मालिका

भजने

मायभूमि पाहूं यांची आम्हीं डोळां । चलावें गोपाळा सहजासहज ॥१॥ भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदि । तयाची समाधि आपेगांवीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माया जिवलगा जातां बैसली कृष्ण म्हणे गे आई ।दळण दळिण शिणलिसी हात लावुं गे आई । समान तळी तळींवरी ठेवी पावो ठायीं ॥ क्षणामाजी मी वो दळीन तु कोतुक पाहीं ॥ धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माया पुरातनु तूंचि वो जननी । नाम संजीवनी विठठल वो ॥१॥ तेंचि हें वोळलें पूर्ण प्रेम आम्हां । लोलंगित ब्रह्मा पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माया मोहोजाळीं होतों सांपडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥ काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥ न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माया म्हणजे नसतेंचि दिसें । गगनीं जैसें दोनी चांद ॥१॥ असें एक भासे आणीक । तया नांव मायीक पसारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माया साक्षी आम्ही नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥१॥ सत्याचिये साठी अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नानाकर्में ॥१॥ काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माये आधीं लेक जन्मली । दोघींच्या लग्नाची आयती केली ॥१॥ कोण नोवारा कोण नोवरी । अर्थ पाहतां न कळे निर्धारीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मायें मोकलिलें कोठें जावें बाळें । आपुलिया बळें न वांचे तें ॥१॥ रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायेचा कळवळा मायाची जाणे । तैसें मी तान्हें माऊलिये ॥१॥ विठठल श्रीरंग डोळस प्रसन्न । नित्य अमृतघन वोळला सदा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥१॥ न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा वेडावली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥ नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव