भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिलणीची फळें कैशीं चाखोनी वाहातसे देवासी

milanichi phalen kaishin chakhoni vahatase devasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मिलणीची फळें कैशीं चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥ भावें तिचीं अंगिकारी सर्वाहुनी कृपा करी ||२॥ गुज वान्नरांसी पुसावें। राक्षसातें हो जिंकावें ॥३॥ वान्नर अवधे भुभुःकार बोलताती रामासमोर ॥४॥ आज्ञाकरावीआम्हांसी। रावणआणितोंतुम्हांपासीं||५|| तुझ्या नामाच्या प्रतायें। हनुमंत गेला जी संतापें ॥६॥ सीताशुद्धि करुनी आला दासी जनीस आनंद झाला ||७||