भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिठी घालूनियां भक्तां । म्हणे सिणलेती आतां

mithi ghaluniyan bhaktan | mhane sinaleti atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिठी घालूनियां भक्तां । म्हणे सिणलेती आतां ॥१॥ धांवे चुरावया चरण । ऐसा लागवी आपण ॥२॥ योगियासी भेटी नाहीं । तो आवडीनें कवळीं बाहीं ॥३॥ एका जनार्दनीं भोळा । भक्तां आलिंगीं सांवळा ॥४॥