भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया

mithya mayajal mrugajal badha | lagalase dhanda sansariya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥ आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥ बंधनापासूनि बांधलासे पायीं । बुडतों मी डोहीं निर्जळा ये ॥३॥ कोण भरंवसा धरिलासे जिवीं । बळीया सोडवी कदा काळीं ॥४॥ पुत्रपत्नी बंधु म्हणसील झणी । धांवोनि निर्वाणीं पाव आतां ॥५॥ नामा ह्मणे वेगीं सावधान व्हावें । शरणही जावें पांडुरंगा ॥६॥