भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी

milati sakhya maya bahini | hatin gheuni tejaphani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळती सख्या माया बहिणी । हातीं घेउनी तेजफणी ॥१॥ जंव आहे शरीर चांग । तंव काढिताती चांग भांग ॥२॥ नासिल्या शरीरांतें । टाकिताती तया परते ॥३॥ पहा देहीं देव असतां । नाहीं म्हणती सर्वथा ॥४॥ एका जनार्दनीं पंचत्व । मग म्हणती भूतभुत ॥५॥