भजनी मालिका

भजने

मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥ ऐसें ठावें झालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आम्ही । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥१॥ गर्जो हरीचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलों ॥१॥ कायावाचामन विकिलें चरणीं । राहिलों धरूनि कंठीं नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकांहि ठेवलें । भावें विश्वासिते पावले । अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥ चतुरा चतुरशिरोमणी । सकळां जाणतियांचा धणी । करुं जाणतो वांटणी । भाग जैसें त्यापरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मागें बहुतांसी सांगितलें संतीं । वायां हे फजिती संसार तो ॥१॥ अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥ आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥१॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां ॥१॥ टाकोनियां गेला मज पूतनारी । येथेंचि मुरारी गुप्त झाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मांजरें केली एकादशी । इळवरी होतें उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरु ॥१॥ लांडगा वै-सला ध्यानस्थ । तोंवरी असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव