भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुत झाले खेळ । आतां बळ वोसरलें

magen bahut jhale khel | atan bal vosaralen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें बहुत झाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥१॥ हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥ भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥ तुका म्हणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥