भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें

magen bahutansi sambhalilen | aisen varadan aikilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें बहुतांसी सांभाळिलें । ऐसें वरदान ऐकिलें ॥१॥ म्हणवोनी धरिला लाहो । मनींचा संदेहो टाकुनी ॥२॥ अजामेळ पापराशी । नेला निज नित्य टाकुनी ॥३॥ तारिले उदकीं पाषाण । ऐसें महिमान नामाचें ॥४॥ एका जनार्दनीं जाहलों दास । नाहीं आस दुसर्‍याची ॥५॥