भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलों

magen bahutannin manila vishvas | mhanoni mi das jahalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलों ॥१॥ कायावाचामन विकिलें चरणीं । राहिलों धरूनि कंठीं नाम ॥२॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । भक्त आपोआप तरताती ॥३॥