भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागेन तें एक तुज । देई विचारोनि मज

magen ten ek tuj | dei vicharoni maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागेन तें एक तुज । देई विचारोनि मज ॥१॥ नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥ जन्म घेईन मी नाना । बहु सोसीन यातना ॥२॥ रंक होईन दीनांचा । घायें देहपात साचा॥३॥ तुका म्हणे हें चि आतां । देई देई तूं सर्वथा ॥४॥