भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें पुढें विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला

magen pudhen viththal bharala | rita thav nahin urala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें पुढें विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥१॥ जिकडे पहावें तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥२॥ एका जनार्दनीं सर्व देशीं । विठ्ठल व्यापक निश्चयेंशीं ॥३॥