भजनी मालिका

भजने

आतां उरलें तें मत । तेथें वस्तु सदोदित । त्यासी नाहीं अंत । कवणे काळीं ॥१॥ महाकारण शरीर । ज्याचा अभिमानी ईश्वर । मुर्ध्नीं तें घर । ब्रह्माडीचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥ दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥ असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां कारण जें अज्ञान । तेंहीं गेलें वोसरोन । बोधाचें आसन । बैसलें तेथें ॥१॥ कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयीं प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥ जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥ सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरीकथा ॥१॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥ पतितपावनासवें समागम । अपुलाले धर्म चालवीजे॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम