भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां औटपिठींचा मार्ग एक बाई

atan autapithincha marga ek bai

आतां औटपिठींचा मार्ग एक बाई । निशिदिनीं पाहीं शोध करा ॥१॥ औटहात प्रमाण सत्य कीं हे जाण । त्यांतील जें स्थान ऐकें एक ॥२॥ महालिंग स्थान टाळू एके संधीं । तेथें एक सिध्दि तेजोमय ॥३॥ मार्ग तेथ परतले दोहीं भागीं । पश्चिमीं महालिंगी मार्ग ऐसा ॥४॥ सत्रावीचे शिखरीं मार्ग एक गेला । तो म्यां देखियेला याच देहीं ॥५॥ महालिंगीं मार्ग अंत नाहीं ज्याचा । शोध करितां वाचा कुंठीतची ॥६॥ ज्ञानदेव म्हणे हा विचार पाहा । जाणता दाविता विरळा एक ॥७॥