भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास

atan kadhakadhi karo ga pandharinatha | nahin tari vanyan gelon das

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां काढाकाढी करो गा पंढरिनाथा । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥१॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा स्वभावे प्राण घ्यावा ॥ध्रु.॥ मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥२॥ तुका म्हणे जाली अंधळ्याची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥३॥