भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ

atan kanhin sos na karin anik | dharin ten ek hen chi drudh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥ जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥ तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आले ॥३॥