भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे

atan kothavari karun vivanchana | kan he narayana tumhan na kale

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥ सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥ कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥ नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥ चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥