भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवजळ काया पंचतत्त्वमाया

bhavajal kaya panchatattvamaya

भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥ तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥ माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥ निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥