भजनी मालिका
← भजनांकडे परत

भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसऱ्याची

bhale lok nahin sandit olakhi | he ton jhali dekhi dusaryachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसऱ्याची ॥१॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥ समर्थासी काय कोणें हें म्हणावें । आपुलिया जावें भोगावरी ॥२॥ तुका म्हणे तुम्हां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥