भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसागर तोडितं कं रे करितसां चिंता । पैल उभ दाता पांडुरंग

bhavasagar toditan kan re karitasan chinta | pail ubh data pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भवसागर तोडितं कं रे करितसां चिंता । पैल उभ दाता पांडुरंग ॥१॥ निजाचें जें पीठ सोडूनि वैकुंठ । येथें वाळवंट आवडलें ॥२॥ देव गुज सांगे पंढरीसि यारे । प्रेमसुख घ्यारे नाम माझें ॥३॥ तारीन भवसिंधु घ्यारे माझी भाक । साक्ष पुंडलीक करूनि सांगे ॥४॥ काया वाचा मनें दृढ धरा जीवीं । मी त्याचा चालवीं भार सर्व ॥५॥ हें जरी लटिकें नामया पुसा । आहे त्या भरंवसा नामीं माझे ॥६॥