भजनी मालिका
← भजनांकडे परत

भल्याचें दर्शन । तेथें शुभ चि वचन

bhalyachen darshan | tethen shubh chi vachan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भल्याचें दर्शन । तेथें शुभ चि वचन ॥१॥ बोलावी हे धर्मनीत । शोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥ मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥ तुका म्हणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥