भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवव्याघ्र देखोनि भ्याले माझे डोळे । जालेसें व्याकुळ चित्त माझें

bhavavyaghra dekhoni bhyale majhe dole | jalesen vyakul chitta majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भवव्याघ्र देखोनि भ्याले माझे डोळे । जालेसें व्याकुळ चित्त माझें ॥१॥ पाव गा पाव गा पाव गा विठोबा । पाव गा विठोबा मायबापा ॥२॥ तूं भक्ता कैवारी कृपाळुवा हरी । येईं गा झडकरी देवराया ॥३॥ नामा म्हणे नेणें आन तुजवांचूनि । जनक जननी केशिराजा ॥४॥