भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांवीण देवा कोण । सोयरा सज्जन तिहीं लोकीं

bhaktanvin deva kon | soyara sajjan tihin lokin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तांवीण देवा कोण । सोयरा सज्जन तिहीं लोकीं ॥१॥ यालागीं त्यांचीच वास पाहे । आज्ञेंत राहे भक्तांचिया ॥२॥ आवडी ऐसी रुपें धरी । भक्तांचे करी सांगितले ॥३॥ निळा म्हणे लोकीं तिहीं । भक्तांविण आप्त नाहीं देवा ॥४॥