भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तालांगीं अणुमात्र व्यथा । तें न साहवे भगवंता

bhaktalangin anumatra vyatha | ten na sahave bhagavanta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तालांगीं अणुमात्र व्यथा । तें न साहवे भगवंता ॥१॥ करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥२॥ होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपण तो करीतु ॥३॥ प्रल्हादासी दुःख मोठें । होतांची काष्ठीं प्रगटे ॥४॥ ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं ॥५॥