भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांची आवडी धरोनी हृषीकेशी

bhaktanchi avadi dharoni hrushikeshi

रचनाकार: संत बंका · अभंग
भक्तांची आवडी धरोनी हृषीकेशी । उभा पंढरीसी विटेवरी ॥१॥ नामदेवासाठीं दूध पिये वाटी । मिराबाईचें घोटी विष स्वयें ॥२॥ जनीचिया संगे दळूं कांडूं लागे । चोखामेळ्या संगे ढोरे वोढी ।३॥ वंका म्हणे ऐसा भक्तांचा आळुका । ज्ञानियाची देखा भिंत वोढी ॥४॥