भजनी मालिका
← भजनांकडे परत

फळलें तया जन्मांतर । न पडे विसर नामाचा

phalalen taya janmantar | na pade visar namacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
फळलें तया जन्मांतर । न पडे विसर नामाचा ॥१॥ अत्यादरें हरीची भक्ति । झाली विरक्ति विषयाची ॥२॥ कामक्रोधां गिळिलें शांति । अहंकार समाप्ति मदमत्सरा ॥३॥ निळा म्हणे अचिंतन । लागलें अनुसंधान हरिरुपीं ॥४॥