भजनी मालिका
← भजनांकडे परत

फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड

phanas khatan lage god | tethen adhik khay tond

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड ॥१॥ सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथें जे बेलपत्रीं चढे ॥२॥ ऐसा कर्माकर्म विनाश । गुण तेचि होती दोष ॥३॥ एका जनार्दनीं जाण । वायां दोषाचें हें चिन्ह ॥४॥