भजनी मालिका
← भजनांकडे परत

फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं

phajitiche dev magati ghutiroti | apanasathin jaga pidito kalatonden mothin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥ नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसीं आम्हीं ध्याऊं ॥२॥ अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणें मारिती पशुघात ॥३॥ एका जनार्दनीं जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचें काळें तोंड ॥४॥