भजनी मालिका
← भजनांकडे परत

फार बोलूं काय वांया । जाणवेल पाया चित्त माझें

phar bolun kay vanya | janavel paya chitta majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
फार बोलूं काय वांया । जाणवेल पाया चित्त माझें ॥१॥ धन्य धन्य तुम्ही संत । कॄपावंत संसारीं ॥२॥ उत्तीर्णपणें मज दासा । पुरवा इच्छा कृपाळुवा ॥३॥ शरण एका जनार्दनीं । कृपा करुना तुम्हीं संत ॥४॥