भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी

paha paradara jananiye saman | paradravya pashan mhanoni mani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥ निदेसी तूं मुका होऊनि तत्त्वतां । परद्वेषीं निरुतां न घालीं दृष्टि ॥२॥ ऐसें दृढ मनीं धरूनि राहसी । तरी माझें पावसी निजपद ॥३॥ पराकारणें प्राण वेंचि जो सर्वथा । जाणे परव्यथा कळवळोनि ॥४॥ परसुख संतोष धरी जो मानसीं । जरी परलो-कासी जाणें आहे ॥५॥ देहाचा अभिमान न धरावा चित्तीं । धरावी उपरति उपशमु ॥६॥ सर्वकाल प्रीति संतांचि संगति । गावीं अनु-रागें प्रीति नामें माझीं ॥७॥ सर्वांभूतीं सर्वदा ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची ॥८॥ सर्वकाळ परमात्मा आहे सर्वदेशीं । हे भावना अहर्निशीं दृढ धरीं ॥९॥ संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जावें तेथें तेथें लोटांगणीं ॥१०॥ चिंता न करीं नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥११॥