भजनी मालिका

भजने

पाचारितां धांवोनि यावें । ऐसें दयावें वरदान ॥१॥ मग मी तेणें राहेन सुखें । चिंतन मुखें करीं तुमचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पाचारितां यावें बोळविता जावें । हें तों न संभवे तुम्हांपाशीं ॥१॥ जेथिल तेथेंचि प्रगटाल रुपडें । आपुल्या सुरवाडें भक्तांचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पाचारिलें ध्रुवाजवळी त्या रायानें । जाणोनी सन्मानें आला पाशीं ॥१॥ संतोष तो कांहीं बोलवेना वाचे । उदार प्रेमाचें झळंबती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाजी प्रेमपान्हा लाऊनियां सोई । पुन्हा तो न गोवीं येरझारीं ॥१॥ येरझार दारीं घातलासे चिरा । ठेविलेंसे स्थिरा चरणाजवळीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाटोळा तिंमलारे मजवरी घालीं कांबळें ॥ध्रु०॥ आषाढमासिचारे कैसा शीतळ वारा । वर्षतो मेहुलारे कैशा शीतल धारा ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकीं॥१॥ म्हणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाठवुनी दूत आणविलें तिसी । विस्मयो सर्वांसी होत जाला ॥१॥ साशंकित राजा लावीं म्हणे हात । विमान क्षणांत उचलिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥ येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाठीलागे काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥ आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥१॥ आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे ॥१॥ पीतांबर कास घालूनि वनमाळी । काढी उष्टावळी आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पांडवांचे गृहीं जाण । असंख्य जेविले ब्राम्हण । धर्माचें विस्मित मन । संख्येलागीं ॥१॥ तें कळलें वैकुंठा । निर्मिली तेव्हां घंटा । तेव्हां ते गर्जे देखा । संख्या नाद ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ