भजनी मालिका
← भजनांकडे परत

पहा त्रिभुवनीं न दिसे बाइये

paha tribhuvanin na dise baiye

पहा त्रिभुवनीं न दिसे बाइये । नयनांजनीं पाहें आत्मरुप ॥१॥ मन बुध्दि चित्त अंत:करण जाण । या वेगळें निर्वाण ब्रह्म तेंचि ॥२॥ ज्ञानदेवा ब्रह्म लाधलें अवचटें । उन्मनीचा घांट चढतांची ॥३॥