भजनी मालिका

भजने

पंढरीचे सुख पुंडलिकासी आलें । तेणें हैं बाढिलें भक्तालागीं ॥ १ ॥ भुक्ति मुक्ति वरदान दियलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणांलागीं ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई

पंढरीचें सुख पुंडलीक जाणें । येर सोय नेणें तेथील पैं ॥१॥ उत्तम हें स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नानें पावन जगा करितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंढरीच्या सुखा अंत पार नाहीं लेखा । शेषा सह्स्र-मुखा न वर्णवेचि ॥१॥ पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोंजन्मी वारी घडली तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥ भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचना काय लाज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥ राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीराया माझिया बापें । प्रसन्न केलें तुजप्रतापें ॥१॥ आम्हां दिलें तुझे हातीं । पाळीं म्हणे प्रेमभक्ती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥ दुराचार्या मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ती पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीस जावया । सदा हेत मानसीं जया । कळिकाळ वंदी पाया । तया हरिभक्तांतें ॥१॥ दृढ मनींच चिंतन । वाचे विठ्ठलचि जाण । होतु कां कोटी विघ्र । परी नेम नटळे सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावेम । विठ्ठला भेटावें जिव-लगा ॥१॥ कायावाचामन चरणीं ठेवावें । प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव