भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत

pandhariye majhen maher sajani | oviye kandanin gaun git

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥ राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥ उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाई नारदासी गौरवीन ॥२॥ गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥३॥ मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥४॥ निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥५॥ नागोजन मित्रा नरहरी सोनारा । रोहिदास कबिरा सोइऩिरया ॥६॥ परसो भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळांसी ॥७॥ चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥८॥ जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाटका कान्हया मिराबाई ॥९॥ आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥१०॥ आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥११॥ तुका म्हणे माझा बिळया बापमाय । हर्षे नांदों सये घराचारी ॥१२॥