भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावेम । विठ्ठला भेटावें जिव-लगा

pandharis javen jivanmukta vhavem | viththala bhetaven jiv-laga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावेम । विठ्ठला भेटावें जिव-लगा ॥१॥ कायावाचामन चरणीं ठेवावें । प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ ॥२॥ सुखाचें साजिरें श्रीमुख पहावें । जीवें उतरावें निंबलोण ॥३॥ बाहेरी भीतरीं कैवल्य आघवें । वाचे न बोलावें ब्रह्मानंदु ॥४॥ चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण । करी तुझें ध्यान रात्रंदिवस ॥५॥