भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता

pandharis ghade atityayen mrutya | to jay patit adhahpata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥ दुराचार्या मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ती पांडुरंग ॥ध्रु.॥ कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता॥३॥ माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । काळिमा काजळी पावविते ॥४॥ केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥२॥ तुका म्हणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥५॥