भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा

pandharis jate nirop aika | vaikunthanayaka kshem sanga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥ ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां॥२॥ कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये॥३॥ मृगजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥४॥ तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची॥५॥