भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीवाचुनी सुख कोठे नाही

pandharivachuni sukh kothe nahi

रचनाकार: संत बोधले · अभंग
पंढरीवाचुनी सुख कोठे नाही । ते आहे गा पाई विठोबाचे ॥१॥ भाग्यवंत येती हे सुखे घेती । मागुते न येती परतोनिया ॥२॥ बोधला म्हणे धन्ये भाग्य ज्यांचे होये । तरीच त्या सोय सांपडली ॥३॥