भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीच्या सुखा अंत पार नाहीं लेखा । शेषा सह्स्र-मुखा न वर्णवेचि

pandharichya sukha ant par nahin lekha | shesha sahsra-mukha na varnavechi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीच्या सुखा अंत पार नाहीं लेखा । शेषा सह्स्र-मुखा न वर्णवेचि ॥१॥ पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोंजन्मी वारी घडली तया ॥२॥ पंढरीस जातां प्रेम उचं-बळत । आनंदें गर्जत नामघोष ॥३॥ विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखे । विसरला दु:खें देहभाव ॥४॥ नामा ह्मणे त्याचा होईन चरणरज । नुपेक्षील मज पांडुरंग ॥५॥