भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टीं । पडेल कां दृष्टी पुन्हां आतां

nama mhane deva dnyanadev srushtin | padel kan drushti punhan atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टीं । पडेल कां दृष्टी पुन्हां आतां ॥१॥ ज्ञानाचा वियोग जडला ह्रद्‌‍रोग । भेटीचा प्रयोग करा देवा ॥२॥ ज्ञानदेव माझा दाखवा या वेळीं । जीव तळमळी त्याच्याविण ॥३॥ संत अंतरला सखा जाला दूर । आतां पंढरपूर कैसें कंठूं ॥४॥ तुमचें दर्शन ज्ञान कृपादान । पंढरीस येणें ह्याचसाठीं ॥५॥