भजनी मालिका

भजने

नामें घडे निज शांति । तेथें वसे भुक्ति मुक्ति । नाम तारक त्रिजगतीं । दृढभावें आठवितां ॥१॥ म्हणोनि घेतलासे लाहो । रात्रंदिवस नाम गावो । कळिकाळाचे भेवो । सहज तेथें पळतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामें तारिले पातकी । नाम थोर तिहीं लोकीं । नामें साधे भुक्ति मुक्ति । नाम कलीं तारक ॥१॥ नको जाऊं वनांतरीं । रानीं वनीं आणि डोंगरी । बैसोनियां करीं । स्थिर चित्त निमग्न ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामें तो सरता नामें तो परता । नामें पंढरिनाथा भेटविलें ॥१॥ नाम हेंचि तारी नाम भवसागरीं । उतरीं पैलतिरीं नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामें पावन इये लोकीं । नामें पावन परलोकीं । नाम सदा ज्याचें मुखीं । धन्य तो नर संसारीं ॥१॥ नामें कलिमल दहन । नाम पतीतपावन । नाम दीनोद्भारण । नाम जनार्दन वदतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामें पावन हीन याती । नाम जपती अहोरात्रीं । नामापरती विश्रांती । दुजी नाहीं प्राणियां ॥१॥ नका भ्रमुं सैरावैरा । वाउगे तप साधन पसारा । योग याग अवधारा । नामें एका साधतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामें पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामें हरिच्या ॥१॥ घेई नाम सदा । तेणें तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभुतांची निश्चयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामे प्राप्त नित्यानंद । नामें होय परम पद । नामें निरसे भकंद । नाम तारक निर्धार ॥१॥ हेंचि मना दृढ धरीं । वांया नको पंडु फेरी । तेणें होसी हाव भरी । मग पतनीं पडशील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥ नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव