भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा न जातां राउळासी । विठु जातसे घरासी

nama na jatan raulasi | vithu jatase gharasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामा न जातां राउळासी । विठु जातसे घरासी ॥१॥ अरे नाम्या म्हणोनि बाहे । शिव्या देती बापमाय ॥२॥ आमुच्या पोरासी सवे । येणें लावियेली पाहें ॥३॥ करुं नेदी संसारकाम । एका जनार्दनीं हा निष्काम ॥४॥