भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामरूप सोय नाहीं जया रूपा

namarup soy nahin jaya rupa

नामरूप सोय नाहीं जया रूपा । तेंथिलये कृपा खेळों आम्हीं ॥ १ ॥ आम्हां हेंचि रूप अद्वैत स्वरूप । नाहीं तेथें किं लाभ कल्पनेचा ॥ २ ॥ ध्येय ध्यान खुंटे प्रपंच आटे । नाम हें वैकुंठा नेतु असे ॥ ३ ॥ निवृत्ति साधन वृत्तिच संपन्न । नाम हें जीवन अच्युताचें ॥ ४ ॥