तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें
taratim vari tonda cha puraten | antara hen yeten antarichen
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥
taratim vari tonda cha puraten | antara hen yeten antarichen
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥
tarale name apar jan | aisen mahiman namachen
तारले नामे अपार जन । ऐसें महिमान नामाचें ॥१॥ अधम तरले नवल काय । पाषाण ते पाहें तरियेले ॥२॥
taravaya jad mudh | ahe ughad upav
तारावया जड मूढ । आहे उघड उपाव ॥१॥ सोपें रामनाम घेतां । नाहीं तत्त्वतां साधन ॥२॥
taravaya bhole bhakta | krupavant pandharinath
तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ ॥१॥ करुनी मीस पुंडलीकांचे । उभा उगाचि विटेवरी दिसे ॥२॥
tarilin bahuten chukavuni ghat | nam hen amrut svikaritan
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥१॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठी ॥ध्रु.॥
tarilen vo yenen shrigurunayake | bodhachiye kase lavuni kavatuken
तारिलें वो येणें श्रीगुरुनायके । बोधाचिये कासे लावुनि कवतुकें ॥१॥ या भवसागरीं जलासी तुं तारुं । परतोनियां पाहो कैंचा मायापुरु ॥२॥
tari aise jad | udakavari jo dagad
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥ तो हा न करी तें काई । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥
tarin maj atan rakhumaichya kanta | pandharichya natha mayabapa
तारीं मज आतां रखुमाईच्या कांता । पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनि बोलताती ॥२॥
tari maj atan rakhumaichya kanta pandharichya natha mayabapa
तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।।
tarunyachen maden gheshi ekamenkan jhobin | vayan jail naradeh dharin harishi jhombi
तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं । वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥ तरीच खेळ भला रे वायां काय गलबला । एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥
tarunyachya balen gheun dhanvashil jhombi | padaliya talin hanso lagatil ubhi
तारुण्याच्या बळें घेऊं धांवाशिल झोंबी । पडलिया तळीं हांसो लागतील उभी ॥१॥ घेसी तरी घेई हरीसवें घाली मिठी । नेदी पडो तोचि वंदय करील ये सुष्टी ॥२॥
tarunyachya maden na mani konasi | sada musamusi ghuli jaisa
तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥१॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥
taruniyan prachand shila | utarala pala markatancha
तारुनियां प्रचंड शिळा । उतरला पाळा मर्कटांचा ॥१॥ करुनि सिंधु पायवाट वधिले थाट राक्षसांचे ॥२॥
tarun lagalen bandarin | chandrabhagechiye tirin
तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
tighanjananlagin kelen samadhan | sangitali khun antarinchi
तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥ कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥
tinhi tribhuvanin | ahmi vaibhavache dhani
तिन्ही त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥ हातां आले घाव डाव । आमुचा मायबाप देव ॥ध्रु.॥
tinhi dev jaise parabrahminche thase | jagin surya jaise prakashale
तिन्ही देव जैसे परब्रह्मींचे ठसे । जगीं सूर्य जैसे प्रकाशले ॥१॥ धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य तो निधान ज्ञानदेव ॥२॥
tinhi lok runen bandhile jayanen | sarvasiddhi kenen taye gharin
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥
tirthi dhonda pani | dev rokada sajjanin
तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
til ek ardha rai | sitabind pave kai | taya sukha nahin | antapar pahatan
तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । अवघे साव चित्त तों ॥ध्रु.॥