भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें

taratim vari tonda cha puraten | antara hen yeten antarichen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥ भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥ तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥३॥