भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिन्ही त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी

tinhi tribhuvanin | ahmi vaibhavache dhani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तिन्ही त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥ हातां आले घाव डाव । आमुचा मायबाप देव ॥ध्रु.॥ काय त्रिभुवनीं बळ। अंगीं आमुच्या सकळ ॥२॥ तुका म्हणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥३॥