भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां

tarilin bahuten chukavuni ghat | nam hen amrut svikaritan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥१॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठी ॥ध्रु.॥ जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साठी ॥२॥ असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥ तुका म्हणे देव भक्तपण सार । कवतुक- वेव्हार तयासाटीं ॥४॥