भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं

tinhi lok runen bandhile jayanen | sarvasiddhi kenen taye gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसिद्धि केणें तये घरीं ॥१॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥ आषाढी कार्तीकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥२॥ मुक्ती कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥३॥ तुका म्हणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥४॥