भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ

taravaya bhole bhakta | krupavant pandharinath

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ ॥१॥ करुनी मीस पुंडलीकांचे । उभा उगाचि विटेवरी दिसे ॥२॥ ऐसा भक्तांसी भुलला । तारावया उभा ठेला ॥३॥ जनीं जनार्दनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥