भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा

tari maj atan rakhumaichya kanta pandharichya natha mayabapa

रचनाकार: संत लिंबाई · अभंग
तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥