भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां

til ek ardha rai | sitabind pave kai | taya sukha nahin | antapar pahatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥१॥ म्हणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । अवघे साव चित्त तों ॥ध्रु.॥ तीर्थे न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे काशी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥३॥ येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथें ॥३॥